ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ठाणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ठाण्यात महापालिकेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात झाली असून ३० टक्के पाणी कपातीमुळे आठवडाभर ठाणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे आता ठाणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबई पालिकेकडून ठाण्याला ८५ दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. परंतू पाणी पुरवठा करणाऱ्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले. परंतू ठाणे पालिकेच्या पम्पिंग स्टेशनवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता संपू्र्ण ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
कधी आणि कोणत्या विभागात पाणी राहणार बंद?
3 डिसेंबर - माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली.
4 डिसेंबर - गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर 1 व 2, मैत्री पार्क.
5 डिसेंबर - सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर.
6 डिसेंबर - दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर.
7 डिसेंबर - राबोडी 1 व 2, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर,
8 डिसेंबर - लोकमान्य पाडा नं. 1, 2, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड.
दरम्यान या विभागनमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.