वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे ४०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी लष्कराला बोलावण्यात आले. लष्कराचे पथक सलग दहा दिवस मदतकार्यात गुंतले होते.
वायनाडच्या दुर्घटनेतील २२५ मृतांची ओळख पटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुर्घटनेतील ज्या मृतांची ओळख पटवणे कठीण जात आहे त्यांच्यासाठी डीएनए चाचण्या करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. लष्कराने परिसराची डागडुजी करुन वाहतुकीचा मार्ग सुरू केला आहे. यामुळे पुढील मदतकार्य सोपे झाले आहे. लष्कराची मदतकार्याची मोहीम पूर्ण झाली. परतत असलेल्या जवानांचे स्थानिकांनी टाळ्या वाजून, नमस्कार करुन आभार मानले.