Wednesday, December 11, 2024 11:56:15 AM

Shivsena
'नवाब मलिकांबद्दल पुन्हा विचार करावा'

नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली.

नवाब मलिकांबद्दल पुन्हा विचार करावा

मुंबई : नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली. मात्र, अखेरच्या दिवशी नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपने त्यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेनेही राष्ट्रवादीने त्यांच्या या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, अन्यथा आम्हीही नवाब मलिकांविरोधात काम करू अशी भूमिका घेतली आहे. नवाब मलिक यांना आमची महायुती पाठिंबा देणार नाही. तिथे आमचा शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजप-शिवसेना नवाब मलिकांच्या विरोधात काम करतील असे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo