मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ७८९ पैकी ४०५ किमी मार्गावर आणि २० पैकी ६० लोकोवर कवच प्रणालीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून, २०२५ पर्यंत हे सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे आता सांगितले जात आहे.