Monday, October 14, 2024 02:25:31 AM

Swati Maliwal
'आप'च्या महिला खासदाराला मारहाण

केजरीवालांच्या निवासस्थानी, त्यांच्याच स्वीय साहाय्यकाकडून, त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत गैरवर्तन झाले.

आपच्या महिला खासदाराला मारहाण

नवी दिल्ली, १६ मे २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी, त्यांच्याच स्वीय साहाय्यकाकडून, त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत झालेले गैरवर्तन हे सर्वस्वी लज्जास्पद. परंतु, या ‘आप’बीतीविषयी ‘विरोधी आघाडीतील सर्वपक्षीयांनी अगदी सोयीस्कर मौन बाळगलेले दिसते. त्यामुळे महिला अत्याचाराच्या बाबतीत विरोधकांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काय हे प्रकरण आहे आणि यात आता केजरीवाल यांच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होऊ शकते पाहुयात....

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या स्वीय साहाय्यकाने गैरवर्तन केले. विशेष म्हणजे, स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मान्यदेखील केले, तर केजरीवाल यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. केजरीवाल यांचा स्वीय साहाय्यक विभव कुमारला केंद्रीय महिला आयोगाचे बोलावणे आले आहे. त्यामुळे या प्रकरणात केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याशी शक्यता आहे. 

हे प्रकरण नक्की काय आहे ते समजून घेऊ

खासदार स्वाती मालीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानी पोहोचल्या.
केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री निवासावरील दिवाणखान्यात मालीवाल वाट पाहत होत्या.
दिवाणखान्यात केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार पोहोचले.
विभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांना शिवीगाळ आणि मारहाण केली.
स्वाती मालीवाल यांनी ११२ क्रमांकावर संपर्क करुन पोलिसांकडे मदत मागितली.
दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या घरात महिलेला मारहाण झाल्याची तक्रार स्वाती यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण हे ऐकून पोलीस तत्काळ सक्रिय झाले नाहीत.
स्वाती मालीवाल तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्या.
पोलीस स्थानकात स्वाती यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी उशीर झाला.
तक्रार नोंदवल्यानंतर स्वाती मालीवाल कुणाच्याही संपर्कात नाहीत.

'आप'चे खासदार संजय सिंह यांनी स्वाती मालीवाल यांच्यासोबत मुख्यमंत्री निवासस्थानी असभ्य वर्तन झाल्याचं मान्य केले आहे.

कोण आहेत स्वाती मालीवाल ?

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. 
त्यानंतर आम आदमी पार्टीत सक्रिय झाल्या. 
सामाजिक संस्थेत केजरीवालांशी भेट झाली 
भ्रष्टाचाराच्या आंदोलनात केजरीवालांची साथ दिली 
मालीवाल जानेवारी २०२४ला राज्यसभा खासदार झाल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये त्यांच्याच पक्षाच्या खासदार महिलेला झालेल्या मारहाणीवर अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारले गेले. तेव्हा केजरीवाल यांचा चेहरा गोरामोरा झाला. केजरीवाल यांनी प्रश्नाचे उत्तर टाळलेच. शिवाय त्यांच्या बाजूला बसलेल्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीच्या खासदार महिलेला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण होणं हे प्रकरण महत्त्वाचं नाही, असं म्हणत विषयाला बगल दिली. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo