Friday, December 13, 2024 10:45:26 AM

Which express trains are canceled on Sunday?
रविवारी रद्द असलेल्या एक्स्प्रेस गाड्या कोणत्या?

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजता आणि ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी ३.३० वाजता संपणार आहे.

रविवारी  रद्द असलेल्या एक्स्प्रेस गाड्या कोणत्या

मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजता आणि ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी ३.३० वाजता संपणार आहे.  मात्र, सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे रविवारीही लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.मध्य रेल्वेची ठाणे आणि सीएसएमटीमधील नियोजित कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, रविवारही ही कामे सुरू राहणार असल्याने लोकल खोळंबा कायम राहणार आहे. रविवारी २३५ लोकल फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याचप्रमाणे ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील. परिणामी, गेल्या दोन दिवसाप्रमाणे रविवारही लोकलचा उशिराचा कारभार असणार आहे.

 

रविवारी  रद्द असलेल्या एक्स्प्रेस गाड्या

२ जून रोजी अप रेल्वेगाड्या रद्द

मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, जालनाझ्रसीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस

 

२ जून रोजी डाऊन गाड्या रद्द

सीएसएमटी -मडगाव वंदे भारत, सीएसएमटी -नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी -मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी -शिर्डी वंदे भारत, सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन, सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी -जालना जनशताब्दी

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo