Tuesday, January 21, 2025 05:02:38 AM

Devendra Fadnavis
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? रात्री दिल्लीत ठरणार ?

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? या प्रश्नाचे उत्तर रात्री उशिरा दिल्लीतून मिळणार असल्याचे संकेत आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री  रात्री दिल्लीत ठरणार

नवी दिल्ली : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? या प्रश्नाचे उत्तर रात्री उशिरा दिल्लीतून मिळणार असल्याचे संकेत आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात होणाऱ्या चर्चेअंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

फडणवीस आणि अमित शाह यांची भेट होईल त्यावेळी तिथे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित असतील की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण फडणवीस ज्या विमानाने दिल्लीला गेले त्या विमानात शिंदे आणि अजित पवार नव्हते अशी माहिती मिळत आहे. दिल्लीला जाण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यामुळे रात्री काय होणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संध्याकाळी नागरी विमान वाहतूक मंत्री (राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार) मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात अपेक्षित आहे. याआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपत आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एक प्रबळ नेत्याची राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि एका मराठा नेत्याची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण फडणवीस दिल्लीला रवाना होण्याआधी भाजपाच्या अनेक आमदारांनी त्यांनाच मुख्यमंत्री करावे अशी आग्रही मागणी केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा फडणवीसच करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 आमदार विजयी झाले. देवेंद्र फडणवीस नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांना एक लाख 29 हजार 401 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव केला. फडणवीस 39 हजार 7110 मतांनी विजयी झाले. प्रफुल्ल गुडधे यांना 89 हजार 691 मते मिळाली. निवडणूक आयोगाने 29 व्या फेरीअंती मतमोजणीचे सर्व आकडे जाहीर केले आणि फडणवीस यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. 

भाजपाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच भाजपाचे 132 आमदार निवडणुकीत जिंकले आहेत. यामुळे भाजपाचे आमदार फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे यासाठी आग्रही आहेत. लवकरच राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. उत्तर जाणून घेण्यासाठी अनेकांचे लक्ष फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीत होणार असलेल्या भेटीकडे आहे. 

फडणवीसांचे बलस्थान काय ?

फडणवीस यांचे भाऊबंद राजकारणात नाहीत.
फडणवीसांची कोणतीही शिक्षणसंस्था नाही. 
फडणवीसांची कोणतीही सूतगिरणी नाही.
फडणवीसांचा कोणताही साखर कारखाना नाही.
फडणवीसांनी सरकारकडून कोणतेही कर्ज नाही. 
फडणवीसांचे कुटुंबीय पवारांच्या उपकारावर नाहीत.
फडणवीस सरकारचे निर्णय सचिव पातळीवर होतात. 
फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा पवारांचा कट उधळला गेलाय. 
फडणवीसांच्या नेतृत्वात रोहित पवार भाजपात निघाले होते. 
फडणवीसांनी बहुजन राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवलाय. 
फडणवीसांची जात वगळता कोणताच कमकुवत मुद्दा सापडत नाही. 


सम्बन्धित सामग्री