मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी माघार घेतली. काही उमेदवारांनी मात्र माघार घेण्यास नकार दिला. यामुळे काही ठिकाणी महायुती आणि मविआच्या मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता आहे. तर काही ठिकाणी माघारीमुळे अधिकृत उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे बंधू दिलीप भामरे यांची नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माघार
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात माकप नेते डॉ डी.एल कराड यांची माघार
नाशिक पश्चिम मतदारसंघातून जरांगे समर्थक करण गायकर यांची माघार
भाजपाच्या नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरेंना दिलासा
माहीममधून मनसेच्या अमित ठाकरेंविरोधात अपक्ष म्हणून सदा सरवणकर लढणार
बोरिवलीतून भाजपाचे बंडखोर, अपक्ष उमेदवार गोपाळ शेट्टींची माघार, भाजपाच्या उपाध्याय यांना दिलासा
नाशिक मध्य मध्ये काँग्रेसच्या हेमलता पाटील यांची माघार
नाशिक मध्य मध्ये मनसेच्या अंकुश पवार यांची माघार
देवळालीतून बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप यांची माघार
नाव वापरू नका अशी बबनरावांनी नोटीस काढल्यानंतर तनुजा घोलप यांची माघार
दिंडोरीतून शिवसेना बंडखोर, अपक्ष उमेदवार धनराज महालेंची माघार
पुण्यातील पुरंदरमध्ये महायुतीची मैत्रीपूर्ण लढत; विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे
काँग्रेसचे मनोज शिंदे कोपरी पाचपाखाडी मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे सेनेच्या केदार दिघेंविरोधात लढणार
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांची माघार
धुळ्यात शिवसेनेच्या मनोज मोरे यांची माघार
दिंडोरी आणि अणुशक्तीनगरमध्ये शिवसेनेची माघार
शिवसेनेच्या अक्षय जाधवांची माघार
बुलढाण्यात भाजपाच्या विजयराज शिंदेंची माघार
नगरमधील मविआची बंडखोरी कायम
भोर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम
इंदापूरमध्ये प्रवीण मानेंची बंडखोरी कायम
आंबेगावात मविआत बंडखोरी कायम