Wednesday, February 12, 2025 06:00:57 AM

Why did Shinde put 'these' MLAs on waiting
शिंदेंनी 'या' आमदारांना का ठेवले वेटिंगवर; गुवाहाटी ते शपथविधीपर्यंतचा प्रवास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच दोन आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मात्र डोकेदुखी वाढलीय.

शिंदेंनी या आमदारांना का ठेवले वेटिंगवर गुवाहाटी ते शपथविधीपर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सद्या सर्वांचच लक्ष लागून आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या निवडणुकांमध्ये राजकारणात अनेक बदल झाले. कुठे बंड झालेत तर कुठे पक्षफोडी. त्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच दोन आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मात्र डोकेदुखी वाढलीय. 

कोणाला ठेवले वेटिंग? 
आमदारांची  ही वेटिंग चर्चेचं कारण ठरतेय कारण हेच वेटिंगला असणारे दोन आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला होते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा,  शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच आमदार पक्षप्रमुखांची भेट घेताय. मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे  दीपक केसरकर आणि तानाजी सावंत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल पाच तास वेटिंगला ठेवलं असल्याची माहिती समोर आली आहे. 

काय आहे गुवाहाटी प्रकरण? 
दिनांक 20 जून 2022 रोजी विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर रात्रीच एकनाथ शिंदे 16 आमदारांसह नॉट रिचेबल झाले. त्या रात्री ते सूरतमध्ये गेले असल्याची चर्चा होती. तब्बल 16 आमदार सोबतच गायब झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण घडामोडीत एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी बंड केलं त्याचबरोबर 10 अपक्षांचाही यात समावेश होता. 

हे सर्व आमदार नंतर सूरतहून गुवाहाटी, पुढे गोवामार्गे राज्यात थेट सत्तास्थापनासाठी आले. दिनांक 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यममंत्रिपदाची शपथ घेतली. 

दरम्यान आता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरमध्ये रविवारी, 15 डिसेंबर रोजी होणार असून इच्छुकआमदारांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री