Virar Shcoking video: पती-पत्नींमधील नातं हे विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. जर दोघांपैकी कोणीही एकमेकांशिवाय तिसऱ्याच व्यक्तीशी नातं सुरू केलं तर दोघांच्यातील विश्वासाला आणि नात्याला तडा जातो. पती-पत्नींमधील नात्याचे मूळ असते 'विश्वास'... लग्न समारंभावेळी, आपण एकमेकांवर प्रेम करण्याचे आणि विश्वासू राहण्याचे वचन देतो. पण जेव्हा तिसरी व्यक्ती त्यांच्यामध्ये येते तेव्हा तो विश्वास तुटतो. जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्या कोणासोबत दिसते तेव्हा आपण खूप दुखी होतो. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. पण जर कोणी आपल्याला फसवले तर त्याचे परिणाम गंभीर असतात. लग्नानंतरही अनेक लोक इतर लोकांशी शारीरिक संबंध ठेवत राहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका पत्नीने तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आहे.
हेही वाचा - Reel साठी वाट्टेल ते! धोकादायक स्टंट करताना झालं असं काही.. चालत्या ट्रेनच्या खिडकीत लटकला... व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप
ज्याप्रमाणे पती-पत्नीमधील नाते प्रेम आणि विश्वासावर आधारित असते, त्याचप्रमाणे प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीमधील नाते देखील प्रेम आणि विश्वासावर आधारित असते. आज एकाच वेळी दोन लोकांशी संबंध ठेवण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेत बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. विरारमध्ये एका पुरूषाला त्याच्या पत्नीने दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ पकडले आणि भीतीपोटी या व्यक्तीने असे काही केले की तुम्हाला हसायला येईल.
ही घटना विरार पूर्वेला घडली आणि त्या पुरूषाच्या पत्नीने त्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले, त्यानंतर त्याने तलावात उडी मारली. पत्नी इतकी घाबरली की तिने तलावात उडी मारली. बरं, त्याने उडी मारली, पण त्याला पोहायलाही येत नव्हते. या दरम्यान, तो पाण्यात बुडताना आणि मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी दोन-तीन तरुण येऊन त्याला बाहेर काढतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ virarmerijaan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
हेही वाचा - आरोग्यदायी दह्यातही भेसळ? फेविकॉल किंवा मायोनीजसारखं दिसतंय दही; 'अमूल दही'चा व्हिडीओ पाहून बसेल धक्का!