अवघ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोठमोठ्या गोलंदाजांना आपल्या वादळी फलंदाजीने गार केल आहे. आयपीएलमध्ये त्याचा आतापर्यंतचा फॉर्म पाहता वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापासून आता फार दूर नाही. अशातच वैभव सूर्यवंशीला लवकरच टीम इंडियाच्या जर्सीत पाहता येणार असल्याची शक्यता वर्तावली जात आहे.
टीम इंडिया यंदा जूनमध्ये आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समिती वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियामध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशीचं सध्याच वय हे 15 वर्ष आहे, त्यामुळे तो राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, सध्याचा त्याचा फॉर्म पाहता निवडकर्त्यांनी वैभव सूर्यवंशीचे नाव शॉर्टलिस्ट केले आहे. दरम्यान 2025 च्या आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर वैभव सूर्यवंशी अंडर-19 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार फटकेबाजीसह झळकला.
हेही वाचा- Praful Hinge: विदर्भचा पोट्टा! प्रफुल्ल हिंगेची पदार्पणात धडाकेबाज कामगिरी; पहिल्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेऊन रचला इतिहास
अशातच सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून त्यांची तुफानी कामगिरी पाहायला मिळते आहे. जर जूनमध्ये वैभवने टीम इंडियासाठी पदार्पण केले, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात खेळणारा खेळाडू ठरेल. यावेळी जूनमध्ये होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यात दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जूनला तर दुसरा 28 जूनला होईल. अशातच वैभव सूर्यवंशीचा डेब्यू येत्या जून महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.