Thursday, February 12, 2026 03:35:59 AM

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "दानवेंची शिंदेसेनेत जाण्याची प्रोसेस सुरु झाली" अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? शिवसेनेतील बड्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बडा नेता महायुतीत जाण्याच्या वाटेवर असल्याची समीकरणे समोर येत आहेत.

eknath shinde vs uddhav thackeray  quotदानवेंची शिंदेसेनेत जाण्याची प्रोसेस सुरु झालीquot अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार शिवसेनेतील बड्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बडा नेता महायुतीत जाण्याच्या वाटेवर असल्याची समीकरणे समोर येत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसणार असं चित्र समोर उभं राहतय. येत्या काही दिवसात ठाकरे गटातील मोठा नेता शिवसेनी शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याकडून समोर येत आहे.

हेही वाचा- Jyoti Waghmare vs Ganesh Naik : नाईकांची शिंदेंवरील टीका जिव्हारी, ज्योती वाघमारेंनी थेट औकात काढली
शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्या वक्तव्याने राजकीयवर्तूळात पुन्हा नवीन एक खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे लवकरच शिंदे गटात येणार असा दावा उदय सामंत यांनी केला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटात येण्याची प्रोसेस सुरु आहे. दानवे लवकरच आमच्या पक्षात येतील असं गंभीर वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले की, "अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासु आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोडेच दिवसात ते आमच्यासोबत असतील."


सम्बन्धित सामग्री