Thursday, November 13, 2025 08:40:07 AM

ICC Women's World Cup Prize Money: हरमनप्रीत कौरचा संघ इतिहास रचणार का? विजेत्याला संघाला किती रक्कम मिळणार

भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून, दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच अंतिम सामना आहे. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या वर्षी एक नवीन विजेता निश्चित होणार आहे.

icc womens world cup prize money हरमनप्रीत कौरचा संघ इतिहास रचणार का विजेत्याला संघाला किती रक्कम मिळणार

ICC Women's World Cup Prize Money: भारतीय महिला क्रिकेट संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 1983 मध्ये पुरुष संघाने विश्वचषक जिंकून संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगीरी केली होती. तसाच ऐतिहासिक क्षण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघ पुन्हा निर्माण करू शकतो. रविवारी सुरू असलेल्या ICC महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून, दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच अंतिम सामना आहे. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या वर्षी एक नवीन विजेता निश्चित होणार आहे.

उपांत्य फेरीत जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद 127 धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 89 धावांच्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला.  

हेही वाचा - IND-W vs SA-W Final: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक सामन्यात शेफाली-स्मृतीची जोडी चमकली! टीम इंडियाची दमदार सुरुवात

इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम

ICC ने या विश्वचषकासाठी बक्षीस रक्कमेत मोठी वाढ जाहीर केली आहे.

विजेत्या संघाला: 4.48 दशलक्ष डॉलर (अंदाजे 39.55 कोटी)
उपविजेत्या संघाला: 2.24 दशलक्ष डॉलर (अंदाजे 19.77 कोटी)
उपांत्य फेरीतील संघांना: 1.12 दशलक्ष डॉलर (अंदाजे 9.89 कोटी) 
प्रत्येक गट सामन्याच्या विजेत्या संघाला 34,314 डॉलर  (सुमारे 30 लाख) मिळतील.
याशिवाय, प्रत्येक संघाला सहभागासाठी 250,000 डॉलर (22 लाख) मिळतील.

हेही वाचा - Ind vs South Africa Women's World Cup Final : साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारत करणार फलंदाजी

समान वेतनाचा विचार

BCCI महिला क्रिकेटपटूंना पुरुष संघाप्रमाणेच बक्षिसे देण्याच्या दिशेने विचार करत आहे. अमेरिकेत झालेल्या पुरुष T20 विश्वचषकानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला 125 कोटी बक्षीस मिळाले होते. तसाच सन्मान महिला संघालाही मिळू शकतो. जर भारताने हा विश्वचषक जिंकला, तर तो महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरेल. जो महिला प्रीमियर लीगच्या यशालाही मागे टाकू शकतो. 


सम्बन्धित सामग्री