ASEAN Summit 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीबद्दल अटकळ बांधल्या जात आहेत. पाच दिवसांत मलेशियात होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतापासून अमेरिकेपर्यंत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मलेशियात 26 ऑक्टोबर 2025 रोजी आसियान शिखर परिषद सुरू होणार असून या परिषदेला दोन्ही नेते उपस्थित राहतील, अशी अनौपचारिक माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत भारत सरकारने तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा - Hongkong Flight Accident : हॉंगकॉंगमध्ये मोठा विमान अपघात, दोघांचा मृत्यू, चार जखमी
मलेशियाच्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहभागाची माहिती दिली असली तरी मोदींच्या दौऱ्याबाबत अद्याप स्पष्ट संकेत नाहीत. यामुळे दोन्ही देशांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संभाव्य भेटीचे महत्त्व विशेष मानले जात आहे, कारण सध्या अमेरिका-भारत व्यापार तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शिवाय, नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जी20 परिषदेला ट्रम्प उपस्थित राहतील की नाही, याबद्दलही संभ्रम कायम आहे.
हेही वाचा - Trump-Zelensky Meeting: व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचा कराराच्या नावाखाली झेलेन्स्कींवर दबाव? सह्या करा नाहीतर....
त्यामुळे मलेशियातील आसियान परिषद या दोन्ही देशांच्या नेतृत्वातील थेट संवादाची एक दुर्मिळ संधी ठरू शकते. दोन्ही नेते एकत्र आले, तर जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक घडामोडींना दिशा मिळू श