मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा दारूण पराभव झाला. लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभेत 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनाही निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासाठी मतदारसंघात मदत करण्याचे सुतोवाच भाजपाच्या नेत्यांनी केले होते. मात्र राज यांनी कोणालाही टाळी देण्यासाठी हात पुढे केला नाही. परिणामी अमित ठाकरे यांचाही पराभव झाला.
विधानसभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशीही चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : 100 दिवसांत प्रशासकीय कामे पूर्ण नाही झाली तर... मुख्यमंत्री फडणवीस घेणार अधिकाऱ्यांचा समाचार
मनसे इंजिन कोठे धावणार?
शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून 2007 साली मनसेची केली होती स्थापना.
2009 विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागांवर विजय मिळवला होता.
2014 आणि 2019 विधानसभेत मनसेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं.
2024 मध्ये मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
मनसेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले होते.
मतदारराजाने मनसेला नाशिक आणि डोंबिवली महानगरपालिकेत मनसेला काम करण्याची संधी दिली होती.
मात्र, मनसेला त्यांना एकदा मिळवलेले यश पुन्हा मिळवता आले नाही.
2014 लोकसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी भूमिका घेत मनसेचे उमेदवार उभे केले नाहीत.
त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका भाजपविरोधात झाली.
त्यावेळी भाजपा विरोधातील 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रचार भरपूर गाजला.
2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला.
2024 विधानसभेत मनसे पुन्हा 'एकला चलो रे' च्या भूमिकेत होती.
बदलत्या भूमिकेमुळे मनसेला मतदारराजाने गांभीर्याने घेतलेच नाही.
आता आगामी निवडणुकांसाठी मनसेची नवी राजकीय समीकरणाची नांदी सुरूय.
अलिकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सलग दोन आठवड्यात कौटुंबिक लग्नसोहळ्यात एकत्र भेटले. त्यावरून दोघांमध्ये पुन्हा दिलजमाई होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
"मनसेनं लोकसभेला दिलेल्या पाठिंब्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मंगळवारी राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पक्षाची आगामी रणनिती ठरवताना पक्षात फेरबदल करण्याचे संकेत त्यांनी दिले. या बैठकीत ठाकरे गट वा अन्य कोणासोबत जाण्याबाबतही चर्चा झाली.
संदीप देशपांडे, प्रवक्ते, मनसे
"मनसेच्या बदलत्या भूमिकेचा त्यांना नेहमीच तोटा झाला आहे. पक्षाचे नेतृत्व प्रभावशाली असतानाही मनसेला निवडणुकीत यश मिळत नाही, यावर मनसेनं मंथन-चिंतन करण्याची आवश्यकता आहे."
क्लिक करा. - जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.