Skydiving Survival Story: मनुष्याने सामान्य परिस्थितीत 4 मजली इमारतीवरून जमिनीवर कोसळलं तरी जगण्याची शक्यता फक्त 50 टक्के असते. तर 7 मजली उंची म्हणजे साधारण 84 फूट त्या अंतरावरून पडल्यास मृत्यूची शक्यता तब्बल 90 टक्के पर्यंत जाते, असं तज्ज्ञ सांगतात. अशा वेळी 14,500 फूट म्हणजे जवळजवळ अडीच मैल उंचीवरून कोणीतरी खाली पडला तर काय होईल? उत्तर एकच कुणाचंही जगणं जवळपास अशक्य. पण एक 47 वर्षांची महिला या अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून जिवंत बाहेर आली. आणि त्याहून मोठी twist म्हणजे… तिला फायर अँट्सने म्हणजेच जिवंत मुंग्यांनी काही प्रमाणात वाचवलं!
ही कथा 1999 सालातील. जातीनं स्कायडायव्हिंग करणाऱ्या आणि 37 वा फ्री-फॉल करण्यासाठी उत्सुक असलेल्या Joan Murray नावाच्या महिलेनं नॉर्थ कॅरोलिना येथे स्कायडायव्ह करण्याचं ठरवलं. उपकरणं व्यवस्थित पॅक करून तिनं विमानातून उडी मारली. सगळं परफेक्ट वाटत होतं. पण पॅराशूटचा मुख्य दोर ओढल्यावर काहीच झालं नाही! ती ताशी 80 माईल वेगाने थेट जमिनीकडे झेपावत होती.
स्टार न्यूजच्या जुन्या रिपोर्टनुसार, तिनं अगदी शेवटच्या क्षणी साधारण 700 फूटांवर आणीबाणीचा मार्ग उघडण्यात करण्यात यश मिळवलं, पण तेही नियंत्रणाबाहेर जात होतं. तिनं स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न केला, तरी शरीराचं वजन, वारा, वेग सगळं तिच्याविरोधात होतं. आणि काही सेकंदांतच ती जोरदार आपटली!
पण महत्वाचा ट्विस्ट इथे घडला ती ज्या ठिकाणी कोसळली, तिथे एक मोठा live fire ant mound होता. हजारो लाल मुंग्या जमिनीवर सतत
सक्रिय असतात तो भाग. पडल्यावर या मुंग्यांनी तिच्या चेहऱ्यावर, शरीरावर प्रचंड चावले. तिचं शरीर जवळजवळ तुटलं होतं अनेक हाडं फुटली, दातांचे फिलीन्ग्स बाहेर उडाले, ती कोमात गेली. तरीही ती वाचली.डॉक्टरांनी तिच्या रिपोर्टवर एकच शब्द लिहिला होता 'miracle'.
तज्ज्ञांचं म्हणणं असं की fire antsच्या चाव्यामुळे तिच्या शरीरात अचानक एड्रेनालाईन स्पाइकझाला. शरीर शॉकमध्ये जाण्याऐवजी कार्यशील राहिलं. यामुळे महत्वाचे अवयव पूर्ण बंद टळला. म्हणजेच ज्या मुंग्यांच्या चावण्यानं वेदना प्रचंड झाल्या, त्या वेदनांमुळेच कदाचित तिचा मृत्यू टळला!
दोन आठवडे कोमात राहिल्यानंतर ती हळू हळू बरी झाली . उपचार प्रक्रिया खूप लांब आणि कठीण होती पण ती शेवटी वाचली. या घटनेनंतर जगभरात हा किस्सा 'impossible survival' च्या उदाहरणांमध्ये उल्लेख केला जातो. 14,500 फुटांवरून फ्री-फॉल, पॅराशूट बिघाड, आपत्कालीन शटर अनियंत्रित हाडं तुटलेली, आणि शेवटी फायर मुंग्या आणि तरीही ती महिला आज जिवंत आहे.