४ सप्टेंबर, २०२४, पालघर : पालघर तालुक्यातील सावरे आणि एंबुरे परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस सेवा पंधरा दिवसांपासून बंद झाली आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बुधवारी ४ सप्टेंबर, २०२४ रोजी परिसरातील विद्यार्थिनी, महिलांनी, आशा सेविका, ग्रामसेविका आणि महिला सरपंचांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला होता. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे अकरा किलोमीटरचा हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे.