सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटणमधील चाफळच्या प्राचीन श्रीराम मंदिरात मकर संक्रांत उत्साहात साजरी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो सुवासिनी महिलांनी मंदिर आवारात संक्रांतीचे वाण मांडून पुजा केली. महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून तीळ गुळ वाटत शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह: पहिल्या शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी
लग्न झाल्यानंतर सलग तीन वर्षे येथे येऊन सितामाईचे दर्शन घेऊन वसा, वाण घेण्याची प्रथा परंपरा आहे. संक्रांतीला चाफळमध्ये महिलांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. सितामाईचे संक्रातीचे वाण मांडून पुजा करून अखंड सौभाग्याचे सितामाईकडे दान मागितले. यावेळी एकमेकींची ओटी भरत भागात गुलालाचा मळवट भरत उखाणेही घेतले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सितामाईचे वाण घेतल्यास अखंड सौभाग्य दान मिळून कुटुंब परिवारास समृद्धी लाभते अशा श्रद्वेने आलो असल्याचे सुहासिनींनी भाविक महिलांनी सांगितले.