Thursday, July 17, 2025 01:47:59 AM

महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान 'या' दिवशी येणार आमनेसामने

महिला T20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 12 जून 2026 पासून इंग्लंडमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.

महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर भारत-पाकिस्तान या दिवशी येणार आमनेसामने
ICC Women’s T20 World Cup
Edited Image

ICC Women’s T20 World Cup Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला T20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 12 जून 2026 पासून इंग्लंडमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. यावेळी पहिल्यांदाच 12 संघ विश्वचषकात सहभागी होत आहेत, ज्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. 

इंग्लंडमध्ये खेळण्यात येणार महिला T20 विश्वचषक - 

महिला T20 विश्वचषक 2026 पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. हा विश्वचषकचा 10 वा आवृत्ती असेल. जूनमध्ये होणाऱ्या या विश्वचषकातील पहिला सामना 12 तारखेला होईल. ज्यामध्ये यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होतील, त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वचषक असेल. ICC ने यासाठी दोन गट तयार केले आहेत. गट-1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, पात्रता, पात्रता संघाचा समावेश असेल. तर गट-2 वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, पात्रता, पात्रता संघाचा समावेश असेल. 

हेही वाचा - ICC World Test Championship Final 2025: भारतात WTC फायनल होणार की नाही?

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने - 

महिला T20 विश्वचषकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. भारत-पाकिस्तानमधील सामना 14 जून रोजी एजबॅस्टन येथे खेळला जाईल. 

हेही वाचा - Farewell in Australia: जे BCCIने केलं नाही, ते आता ऑस्ट्रेलिया करणार; विराट-रोहितला मिळणार खास फेअरवेल

33 सामने खेळण्यात येणार -

दरम्यान, 24 दिवसांच्या या स्पर्धेत 33 सामने खेळले जातील. हे सामने एजबॅस्टन, हॅम्पशायर बाउल, हेडिंग्ली, ओल्ड ट्रॅफर्ड, द ओव्हल, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड आणि लॉर्ड्स या 7 ठिकाणी खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. तथापी, 5 जुलै रोजी लॉर्ड्स येथे अंतिम फेरी होईल. 
 


सम्बन्धित सामग्री