मुंबई : राज्यात बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. बारामती, शिर्डी आणि धाराशिवमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
धाराशिव जिल्ह्यात ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. 28 हजार ग्रामपंचायतींचा आंदोलनात सहभाग आहे. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे भूम तालुक्यातील सर्वात मोठी पाथरूड ग्रामपंचायत त्याचबरोबर अनाळा ग्रामपंचायत कार्यालयाकडून देखील कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 हजार 316 ग्रामपंचायतींकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामपंचायतींचा एल्गार पाहाला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत आज बंद आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज महाराष्ट्रातील सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत बंदची हाक देण्यात आली. या हाकेला बारामतीत चांगला प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये आज दिवसभर बंद असणार आहेत.
आज राज्यभरात मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ग्रामपंचायतींकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सरपंच परिषदेने विविध मागण्या केल्या आहेत.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा
काय आहेत सरपंच परिषदेच्या मागण्या?
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य संरक्षण कायदा करावा
प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण द्यावं
सरपंचांना विमा संरक्षण आणि पेन्शन लागू करावी
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी
संतोष देशमुखांच्या गावात स्मारक उभारावं
ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत इतरांना बंदी असावी