चेन्नई : भारताने बांगलादेशविरुद्धची चेन्नई कसोटी २८० धावांनी जिंकली. आर. अश्विन सामनावीर झाला. या विजयामुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना शुक्रवार २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क येथे होणार आहे. चेन्नई कसोटीतील विजयामुळे भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले आहे.
भारताने आतापर्यंत १० कसोटी सामन्यांपैकी ७ जिंकले आहेत. भारतीय संघाचा दोन सामन्यात पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला. यंदाच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सध्या भारताचे विजयाचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वाधिक आहे.
अश्विन चमकला
निर्णायक डाव खेळणाऱ्या बांगलादेशचे सहा फलंदाज आर. अश्विनने बाद केले. याआधी भारताच्या पहिल्या डावात आर. अश्विनने १३३ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांच्या जोरावर ११३ धावा केल्या होत्या. फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रभावी कामगिरीसाठी आर. अश्विनला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला.
- चेन्नई, भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी
- भारत २८० धावांनी विजयी
- सामनावीर : आर. अश्विन
- भारत पहिला डाव सर्वबाद ३७६ धाव
- भारत दुसरा डाव ४ बाद २८७ धावा, डाव घोषीत
- बांगलादेश पहिला डाव सर्वबाद १४९ धावा
- बांगलादेश दुसरा डाव सर्वबाद २३४ धावा