Monday, March 09, 2026 02:59:42 AM

AI Girlfriend and Boyfriend : प्रेमाचं नवं स्वरुप! या कॅफेमध्ये व्हॅलेंटाईन डेला AI गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत डेटिंग

या कॅफेची रचना पारंपरिक डेटिंग रेस्टॉरंटसारखीच आहे, पण येथे दोन खुर्च्यांच्या ऐवजी 'सिंगल सीट' टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलावर एक विशेष 'मोबाईल स्टँड' बसवण्यात आला आहे, जेणेकरून...

ai girlfriendboyfriend  प्रेमाचं नवं स्वरुप या कॅफेमध्ये व्हॅलेंटाईन डेला ai गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत डेटिंग

Dating with AI Girlfriend and Boyfriend : व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर न्यूयॉर्कमध्ये मानवी नात्यांच्या पलीकडे जाणारा एक नवा प्रयोग पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रेमाची व्याख्या बदलत चालली असून, आता चक्क एआय (AI) गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसोबत 'डेट'वर जाण्याची संधी एका कॅफेने उपलब्ध करून दिली आहे. हे कॅफे केवळ मर्यादित कालावधीसाठी असले, तरी यातून भविष्यातील मानवी नात्यांचे स्वरूप कसे असेल, याची झलक पाहायला मिळते. 

'ईव्हा एआय कॅफे'चा अनोखा प्रयोग आणि भविष्यातील नात्यांची झलक
न्यूयॉर्कमधील 'हेल्स किचन' (Hell's Kitchen) परिसरात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक विशेष पॉप-अप कॅफे सुरू झाला आहे, ज्याचे नाव 'ईव्हा एआय कॅफे' (Eva AI Cafe) आहे. हे कॅफे 11 आणि 12 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:00 ते 9:00 या वेळेत लोकांसाठी खुले करण्यात आले होते. येथे येणारे ग्राहक कोणत्याही माणसासोबत नाही, तर त्यांच्या मोबाईल किंवा टॅब्लेटमधील 'एआय चॅटबॉट' सोबत डेट एन्जॉय करताना दिसत होते. सोशल मीडियावर या कॅफेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या कॅफेमुळे तंत्रज्ञान आणि मानवी भावनांमधील रेषा अधिक पुसट होत चालली असून, न्यूयॉर्कमधील हा 'एआय डेटिंग'चा ट्रेंड येणाऱ्या काळात इतर शहरांतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Nashik Viral Photo Fact : भूत की अफवा?, जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य; काय म्हणाले गावकरी

कसे पार पडते हे 'डिजिटल' डेटिंग?
या कॅफेची रचना पारंपरिक डेटिंग रेस्टॉरंटसारखीच आहे, पण येथे दोन खुर्च्यांच्या ऐवजी 'सिंगल सीट' टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलावर एक विशेष 'मोबाईल स्टँड' बसवण्यात आला आहे, जेणेकरून ग्राहकाचा एआय जोडीदार त्यांच्या अगदी समोर बसल्यासारखा वाटेल. ग्राहक हेड्सफोन्स लावून त्यांच्या एआय गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी गप्पा मारतात. ज्यांच्याकडे आधीपासून एआय पार्टनर नाही, ते कॅफेमध्ये येऊन Live Voice Chat या फिचरच्या मदतीने नवीन डिजिटल पार्टनर तयार करू शकतात.

एकटेपणावर उपाय, तंत्रज्ञानाचे वेड की चक्क वेडेपणा?
कॅफेची ही संकल्पना 'Same Same Wine Bar' मध्ये राबवण्यात आली आहे. या प्रयोगाचा मुख्य उद्देश एआय सोबतीला समाजात मान्यता मिळवून देणे (Destigmatize) हा आहे. जगभरात 30 वर्षांखालील दर 3 पैकी 1 पुरुष आणि 4 पैकी 1 महिला एआय सोबत्यांशी संवाद साधत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे चॅटबॉट्स कधीही तक्रार करत नाहीत किंवा वाद घालत नाहीत, त्यामुळे अनेक तरुणांना हे सोबती अधिक कम्फर्टेबल वाटतात. अनेकांसाठी ही संकल्पना विचित्र असली, तरी एकटेपणावर मात करण्यासाठी किंवा संवाद सुधारण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय मानला जात आहे.

हेही वाचा - जगाला निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या चीनचा रस्ताही निघाला 'चायनामेड'; पाहा कसा झाला गायब, CCTV फुटेज व्हायरल


सम्बन्धित सामग्री