Tuesday, November 18, 2025 03:54:56 AM

Dangerous Foods: सावधान! कितीही आकर्षक दिसत असले तरीही 'हे' पदार्थ म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण

भरात काही असे अन्नपदार्थ आहेत, जे दिसायला आकर्षक असले तरी खाण्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

dangerous foods सावधान कितीही आकर्षक दिसत असले तरीही हे पदार्थ म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण

Dangerous Foods: जगभरात काही असे अन्नपदार्थ आहेत, जे दिसायला आकर्षक असले तरी खाण्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. यामध्ये नैसर्गिकरित्या विषारी घटक असतात, जे चुकीच्या प्रकारे खाल्ले तर प्राणघातक ठरू शकतात. काही देशांमध्ये हे अन्न पारंपरिक आहाराचा भाग असले तरी त्यांचा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे.

अकी फळ: जमैकामध्ये आढळणारे हे फळ विषारी असते. यामध्ये Hypoglycin A नावाचे विष असते; जे खाल्ल्याने माणूस उलटी, हालचालींमध्ये त्रास आणि कोमामध्ये जाऊ शकतो. हे फळ फक्त पूर्णपणे पिकल्यावर सुरक्षित मानले जाते.

कसावा:  हे रूट फूड आफ्रिका आणि आशियामध्ये खाल्ले जाते. जर ते नीट पाण्यात भिजवले किंवा शिजवले नाही, तर यातून साइनाइड निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे उलट्या, चक्कर किंवा मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा: Unexplored Places: जगातील 'या' 5 रहस्यमय जागा आजही अनभिज्ञ; भारतातील एक बेटही धोक्याचं प्रतीक

फुगु पफर फिश: जपानमधील प्रसिद्ध फुगु पफर फिश देखील जगातील धोकादायक पदार्थांमध्ये येतो. यात Tetrodotoxin नावाचे विष असते, जे सायनाइडच्या तुलनेत 1000 पट जास्त घातक आहे. त्यामुळे हे फक्त विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शेफकडूनच बनवले जाऊ शकते.

सन्नाकजी: कोरियामधील सन्नाकजी म्हणजे जिवंत ऑक्टोपस खाण्याची पारंपरिक डिश आहे. याचे टेंटेकल चावले नाहीत तर गळ्यात अडकल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

हाकार्ल: आइसलंडमधील पारंपरिक डिश हाकार्ल हा पदार्थ ग्रीनलँड शार्कचा मांस वापरून बनतो. जर मांस नीट फर्मेंट केले नाही, तर यात अमोनिया आणि इतर टॉक्सिन्स असतात, जे शरीरासाठी घातक ठरू शकतात.

ब्लड क्लॅम्स: हे समुद्री फिल्टर अन्न आहेत, ज्यात हेपॅटायटिस, टायफाइड आणि डायरिया सारखे व्हायरस जमा होऊ शकतात. योग्य प्रकारे शिजवले नाही तर ते गंभीर आजार होऊ शकतात.

हेही वाचा:Leaves Juice for Skin: 'या' हिरव्या पानांचा रस प्या आणि मिळवा नैसर्गिक ग्लो! पन्नाशी नंतरही चेहऱ्यावर दिसेल तरुणपणाची चमक

 

पॅंगियम: दक्षिण-पूर्व आशियातील पॅंगियम या फळाच्या बिया हायड्रोजन सायनाइड असतात. माणूस जर कच्चा खाल्ला तर मृत्यू होऊ शकतो. म्हणून या फळाला फक्त जमीनात दबवून किंवा फर्मेंट करून खाल्ले जाते.

कच्ची एल्डरबेरी: देखील धोकादायक आहे. यात सायनाइड तयार होणारे घटक असतात. त्यामुळे फळ, पानं आणि बियांचा वापर फक्त शिजवूनच केला जातो.

ड्रॅगन ब्रेथ मिरची: ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. याची तीव्रता 2.48 मिलियन स्कोव्हिल युनिट्स आहे, जी घोस्ट पेपर किंवा कॅरोलिना रीपरपेक्षा जास्त आहे. यामुळे गळ्यात जळजळ, श्वास थांबणे किंवा शॉक येऊ शकतो.

मॅगॉट्स चीज: इटलीतील मॅगॉट्स चीज हा जिवंत कीडांनी भरलेला चीज आहे. जर कीडे काढले नाहीत, तर पेटात संक्रमण निर्माण होऊ शकते. 2009 मध्ये गिनीज बुकने ही चीज जगातील सर्वात धोकादायक पदार्थ म्हणून नमूद केली होती.

जगभरातील हे अन्नपदार्थ आकर्षक असले तरी, त्यांना खाण्यापूर्वी योग्य माहिती घेणे अत्यावश्यक आहे. चुकीने खाल्ले तर जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

 


सम्बन्धित सामग्री