पुणे : खराडीजवळ नदीपात्रात तरुणीचे धड आढळले. पोलिसांनी हे धड जप्त करुन त्याची तज्ज्ञांच्या मदतीने वैद्यकीय तपासणी केली. तज्ज्ञांच्या मते १८ ते ३० वयोगाटातील तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचे हात - पाय कापून त्यांची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोलीस मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.