Fri. Sep 24th, 2021

लातुरात चिकन फेस्टिव्हल

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झाला आहे.

यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिकन सेंटरच्या मालकांनी एकत्र येत लातुरात चिकन फेस्टिव्हल चे आयोजन केले होते. या चिकन फेस्टिवलला तब्बल दोन हजार लोकांनी यात सहभाग घेत चिकनचा आस्वाद घेतला.

या फेस्टिवल मध्ये 125 किलो तांदूळ, 500 किलो चिकन आणि 2000 अंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिकन खव्वयांसाठी मेजवानी देण्यात आली.

कोरोना व्हायरसमुळे चिकनच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.

मात्र चिकन फेस्टिवल घेण्यामागे कोरोना व्हायरस आणि चिकनचा कसलाही संबंध नाही.

चिकन खान्याचे फायदे नागरिकांना समजावेत हाच उद्देश या फेस्टिवलचा असल्याचे आयोजकानी सांगितलं.

या चिकन फेस्टिव्हलला शेकडो लातूरकरांनी हजेरी लावली.

अवघ्या 50 रुपयात एक बिर्याणी, एक प्लेट चिकन 65 आणि एक अंड यामुळे या फेस्टिवलला खव्य्यांनी एकच गर्दी केली होती.

तसेच चिकन खाण्याचे फायदे आणि याची माहिती मिळाल्या मुळे खव्य्यांनी कुटुंबासह या फेस्टिवलला हजेरी लावली.

मागील एक ते दीड महिन्यापासून कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव हा नॉनव्हेज खाल्ल्यामुळे होतो असा गैरसमज पसरविण्यात आला आहे.

तो दूर करण्यासाठी असा उपक्रम आयोजकांनी घेतला. येत्या काही दिवसात असे अनेक उपक्रम घेण्यासाठी आयोजकांना प्रोत्साहन मिळालं आहे.

अधिक वाचा : कोल्हापुरकरांची चिकन फेस्टिव्हलला मोठी गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *