Tue. Jun 28th, 2022

नौदलाच्या २ युद्धनौकांचं जलावतरण

भारतीय नौदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक क्षण आहे.
भारतीय नौदलाची आता ताकद वाढणार आहे. कारण नौदलाच्या २ युद्धनौकांचं जलावतरण आज होणार आहे.
आयएनएस उदयगिरी, आयएनएस सूरत युद्धनौकांचं जलावतरण होणार आहे. जलावतारणानंतर युद्धनौकांवर शस्त्र सामग्री बसवणार आहेत.संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या हस्ते  जलावतरण होणार आहे. मुंबई येथील माझगाव डॉकमध्ये जलावतरण सोहळा पार पडणार आहे.

आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सूरतची वैशिष्ट्ये

आयएनएस उदयगिरी ही फ्रीगेट्स म्हणजेच लढाऊ युद्धनौका आहे.

आयएनएस सूरत ही डिस्ट्रॉयर म्हणजेच विनाशिका युद्धनौका आहे.

भारतीय बनावटीच्या २ युद्धनौकांचं होणार जलावतरण झालं आहे.

जलावतरणानंतर युद्धनौकांवर शस्त्र सामग्री बसवणार आहे.

पुढील ३ वर्षं खोल समुद्रात सशस्त्र चाचण्या घेणार आहेत.

चाचण्या यशस्वी झाल्यावरच या युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.