वकील सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात

जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने वकील सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने वकील सतीश उके यांच्या नागपूरच्या घरी धाड टाकली आहे. त्यानंतर त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ईडीने वकील सतीश उके यांच्या नागरपूरच्या घरी गुरुवारी सकाळी धाड टाकली. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. जमीन व्यवहारप्रकरणी ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संपत्ती हडपल्याचा आरोप सतीश उके यांच्यावर करण्यात आला आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ दल तैनात करण्यात आले असून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे.
फडणवीसांविरोधात याचिका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई होत असल्याचा आरोप वकील सतीश उके यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीसांनी २०१४मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. याविरोधात सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.