Jaimaharashtra news

Zomato, Uber eats, Swiggy, Foodpanda वर कारवाई !

एका क्लिकवर खाद्यपदार्थांची ऑर्डर घेऊन ती घरपोच करणारी Zomato, Uber eats, Swiggy, Foodpanda ही अॅप्स आजकाल सर्वांच्याच मोबाईलमध्ये आढळतात. खाद्यप्रेमींमध्ये लोकप्रिय असणारी ही अॅप्स मात्र आता अडचणीत आली आहेत. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व अॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे.

लोकप्रिय Food Apps कडून कायद्याचं उल्लंघन!

Zomato, Uber eats, Swiggy, Foodpanda या कंपन्यांकडून अन्नसुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन झालंय.

या संदर्भात त्यांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आलीये.

अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत याची माहिती दिली.

भीमरव तापकीर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

पुण्यासह मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात झोमॅटो, उबेर, फूडपांडा, स्विगी यासारख्या नामांकित कंपन्यांनी अन्नसुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण 366 कंपन्यांची तपासणी केली. त्यापैकी 122 कंपन्यांकडे अन्नसुरक्षा मानदे कायद्यान्वये अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे निदर्शनास आलंय.

या संदर्भात एफडीएने नोव्हेंबर 2018 मध्ये तपासणी केली होती.

122 कंपन्यांचे व्यवसाय बंद कऱण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Swiggy या ऑनलाइन अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात विनापरवाना अन्नाचा पुरवठा केल्याची 59 न्याय निर्णय प्रकरणं आहेत.

Zomato कंपनीविरोधात 26 न्यायनिर्णय प्रकरणं दंडात्मक कारवाईसाठी दाखल करण्यात आली आहेत.

या प्रकरणात 19 छोट्या अन्न व्यावसायिकांविरोधात तडजोड प्रकरणं दाखल करून 1,51,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईतील झोमॅटो मिडिया प्रा. लि. या कंपनीविरुद्ध विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी कोर्टात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version