Sat. Feb 27th, 2021

‘सविता भाभी’ कोणाची? नवा वाद पेटला

बहुचर्चित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या आगामी मराठी सिनेमाच्या नावावरून यापूर्वीच ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यावर वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुरू असतानाच आता ‘सविता भाभी’ च्या नावावरून नवा वाद सुरू झाला आहे. ‘सविता भाभी’ हे पात्र आपल्या कॉमिक कॅरेक्टरवरून उचललं असल्याचा आरोप निलेश गुप्ता यांनी केला आहे.

या पात्राचे कॉपीराईट्स आपल्याकडे असल्याचं सांगत ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या टीमला कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे.

‘सविता भाभी’ या नावाचं चावट पात्र एका वेबसाईटसाठी तयार केलं गेलं होतं. त्यावेळी या पात्राने चांगलीच खळबळ निर्माण केली होती. आगामी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमात अशाच पद्धतीचं कॅरेक्टर दाखवलं गेलं असून त्याचं नावही सविता भाभीच ठेवण्यात आल्याचा आरोप गुप्ता यांनी केलाय.

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यावर सविता भाभीच्या नावाची मोठमोठी होर्डिंग्ज लागल्यामुळे त्याबद्दल उत्सुकता चाळवली गेली होती. हे नाव ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सिनेमातील एका कॅरेक्टरचं असल्याचा उलगडा नंतर झाला. अभिनेता आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर ‘सविता भाभी’चं पात्र साकारत आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभय महाजन, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, अमेय वाघ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *