Fri. Sep 17th, 2021

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर संधी?

राजकीय चर्चांना उधाण…

मुंबई –  राजकीय वर्तुळात राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाला संधी दिली जाणार या चर्चेेला उधाण आलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना फोनवरून संपर्क केला असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. काही दिवसांपूर्वी
उर्मिला मातोंडकर यांनी
शिवसेनेवर टीका करत अभिनेत्री कंगना रणौत हिला चांगलेच धारेवर धरत होतं. शिवसेनेत मातोंडकर यांच्यासारखा मराठी अभिनेत्रीचा चेहरा आल्यास त्याचा मोठा लाभ शिवसेनेला होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई मधून उमेदवारीही देण्यात आली होती. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत बंडामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत यश आलं नाही. त्यानंतर मातोंडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता मात्र, राज्यातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी आपली भूमिका मात्र कायम ठेवली होती.

मात्र, शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त चार सदस्यांच्या नावांमध्ये प्रामुख्याने समोर आहे सुनील शिंदे, शिवाजी आढळराव पाटील, सचिन अहिर, आणि वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत आली होती. मात्र, अचानकपणे मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे तर मातोंडकर यांना दिली जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्राकडून  शिवसेनेकडून मातोंडकर यांना संधी दिली जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *