विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून

मुंबई : विधीमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. 14 व्या विधानसभेचं हे पहिलचं हिवाळी अधिवेशन असणार आहे.
गेल्या वर्षी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं होतं. हे हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेबंर पर्यंत झालं होतं. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारा कायदा या अधिवेशनात मंजूर झाला होता.
राज्य विधिमंडळाची एका वर्षात 3 अधिवेशनं होतात. यापैकी अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन मुंबईत होतात. तर हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होतं. गेल्या वर्षी नागपुरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन झालं होतं.