Wed. Oct 5th, 2022

बिबट्या शिरला मुलांच्या बिछान्यात अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या इगतपुरी येथील धामणगाव गावात राहणाऱ्या बर्डे कुटुंबासोबत एक धक्कादायक घटना घडली… बर्डे कुटुंबामध्ये डासांच्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी मच्छरदाणी लावून झोपायची सवय आहे.

13 ऑगस्टच्या रात्री मात्र, एका आगंतुक पाहुण्यामुळे या घरात खळबळ उडाली. बर्डेच्या घरातल्या एका छोट्या मुलाबरोबर त्याच्या मच्छरदाणीत हा पाहुणा रात्री शिरला आणि सकाळी त्या मुलास उठवायला गेलेल्या त्याच्या पालकांना हा पाहुणा बघून पोटात भीतीचा गोळाच आला… हा पाहुणा म्हणजे चक्क बिबट्याचं पिल्लू असल्याने बर्डेंना काय करावं हेच सुचेनासं झालं. त्यांनी या लहान मुलांना बाहेर काढून घर बंद करून घेतले. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला आणि स्थानिक प्रशासनाला दिल्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले.

या संपूर्ण घटनेनंतर गावात मात्र भीतीचं वातावरण आहे. कारण काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

 

काय घडलं नेमकं ?

  • धामणगाव गावात राहणाऱ्या बर्डे कुटुंबासोबत घडली ही घटना 

  • रात्रीच्या सुमारास बिबट्याचं पिल्लू घरात शिरलं

  • डास चावू नये म्हणून मच्छरदाणी झोपलेल्या लहान मुलांसोबतच हा लहान बिबट्यादेखील झोपी गेला

  • बिबट्याच्या पिल्लाला पाहून पालकांची त्रेधातिरपिट उडाली आणि त्यांनी मुलांना बाहेर काढून घर बंद करून घेतले

  • त्यानंतर वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.