Wed. Jun 26th, 2019

गोंदियात बिबट्याची शिकार, पंजे नेले कापून

0Shares

मादी बिबट्याची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठनगाव वन परिक्षेत्राच्या केळवद शिवारात अज्ञात आरोपींनी बिबट्याची शिकार केली. शिकारीनंतर मादी बिबट्याच्या पायाचे चारही पंजे, नखे कापून नेल्याचे समोर आले आहे.

केळवद गावच्या मामा तलावा शेजारी रविवारी मृत बिबट्या एका शेतकऱ्याला दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी बिबट्या मृत अवस्थेत पडले असून त्याच्या पायाचे चारही पंजे कापल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याच्या शरीरावर गोळ्या झाडल्याचेही आढळले. शवविच्छेदन अहवालात बिबट्याला 2 गोळ्या घालण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: