ठाण्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

ठाण्यातील कोरम मॉल परिसरात पहाटेपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे.
सकाळी कोरम मॉल आणि नंतर सत्कार रेसिडेन्सी हॉटेलच्या पार्किंग परिसरातही बिबट्या दिसला होता.
त्यानंतर प्रशासनाकडून बिबट्याला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.
अखेर सत्कार हॉटेलच्या बसेमेन्टमधून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
या ठिकाणी बिबट्या पाण्याच्या टाकीमागे लपला होता.
त्याला बाहेर काढण्यासाठी फटाक्यांचा आवाज केला गेला व वनविभागाकडून बिबट्याला भुल देण्यात आली आणि त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.