Sun. May 16th, 2021

मरोळमधील सोसायटीत बिबटयाचा मुक्त वावर

मरोळ येथे विजयनगरमधील वूडलँड सोसायटीत बिबटयाचा वावर असल्याचं  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आला आहे. याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बिबटयाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आले आहेत. इमारतीच्या परिसरामध्ये बिबट्या आढळला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 20 फेब्रुवारीला ठाण्यातील एका मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती.त्यानंतर पुन्हा अशा रहदारीच्या ठिकाणी बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.तब्बल 7 तासांनी या बिबटयाला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे.

बिबट्याचा मुक्त वावर

मरोळच्या विजय नगरमधील वूडलँड क्रश इमारतीच्या परिसरामत बिबट्याचा वावर आहे.

इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबटया कैद झाला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बिबटयाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हा परिसर  आरे कॉलनीपासून फक्त १०० मीटरच्या अंतरावर आहे.

काही वेळासाठी लोकांना सोसायटीपासून लांब ठेवण्यात आले आहे.

इमारतीच्या परिसरामध्ये बिबट्या आढळला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तब्बल 7 तासांनी या बिबटयाला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *