Jaimaharashtra news

केरळमध्ये महाप्रलयानंतर ओढावलं आजाराचं संकट

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली

केरळमध्ये आलेल्या महापुरानंतर आता आजारांचे एक नवे संकट केरळवर ओढावले आहे. यामध्ये केरळात आतापर्यंत 50 जणांचा दूषित पाण्याच्या रोगांमुळे मृत्यू झाला आहे.

तर दूषित पाण्यामुळे केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. यामुळे 6 जण दगावले असून इतर 34 जणांच्या मृत्यूचं कारणही लेप्टोस्पायरोसिस असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय 9 जणांना तापामुळे तर एकाला डेंग्यूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण 159 जणांना लेप्टोस्पायरोसिसने ग्रासले आहे. आतापर्यंत पुरामुळे 104 लोकांना डेंग्यू आणि 50 हून अधिक जणांना मलेरिया झाला आहे.

यादरम्यान, केरळमध्ये पुरामुळे आतापर्यंत 370 हून अधिकजण मृत्यूमुखी पडले आहेत. 10 लाखांहून जास्त नागरिक स्थलांतरीत झाले आहेत.

Exit mobile version