Wed. Jun 19th, 2019

लेस्बियन तरुणींना विकृत टोळक्याकडून अमानुष मारहाण!

0Shares

भारतात समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असली, तरी अजूनही जगभरात समलिंगी संबंधांना पूर्णपणे स्वीकारलं गेलेलं नाही. याचाच अनुभव लंडनमधील एका लेस्बियन कपलला आला.

काय घडलं या Lesbian मुलींसोबत?

लंडनमध्ये डबलडेकर बसच्या वरच्या डेकवर दोन समलिंगी मुली बसून प्रवास करत होत्या.

त्यावेळी बसमध्ये 15 ते 18 वयाच्या चार मुलांचं टोळकं बसमध्ये होतं.

या मुली समलिंगी असल्याचं मुलांना समजताच त्या विकृत टोळक्याने मुलींवर अश्लील शेरेबाजी करायला सुरूवात केली.

तसंच अर्वाच्य शिवीगाळ करू लागले.

एवढंच न करता त्या दोघींना एकमेकींना किस करण्यासाठी जबरदस्ती करू लागले.

मुलींनी या गोष्टीला नकार दिल्यामुळे चारही मुलांनी त्यांना अश्लील शिव्या देत मारहाण केली.

या मुलींच्या चेहऱ्यावर प्रहार केले.

त्यांच्याजवळील पर्सेसही त्यांनी ताब्यात घेऊन ते पळून गेले.

मुलींनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर चारही विकृत तरणांना अटक करण्यात आलंय.

दोघीही मुली सध्या hospital मध्ये उपचार घेत आहेत.

या संदर्भात दोघींमधल्या मेलनिया गेमाँट या मुलीने आपल्यावरील हल्ला किती भीषण होता, याची जाणीव करून देणारा फोटो पोस्ट केला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: