Fri. Sep 30th, 2022

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? नवीन नाही. शिवाजी महाराजांपासूनच्या काळापासून सुरू आहे. आम्हाला जमीन दाखवणार आहेत, ही गवताची पाती नाहीत, तलवारीची आहेत’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच ‘नगरसेवकांना सांगतोय ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’ असंही भर सभेत स्पष्टच सांगितलं आहे.

‘शिंदे जेव्हा सुरतला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जा’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत असेही म्हटले आहे.

 ‘पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. अमित शाह यांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा’ असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे. तसेच ‘शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झाली आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली… रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाहीय म्हणून मी शांत राहण्यास सांगितले” असंही म्हटलं आहे.

2 thoughts on “‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

  1. Hi, Neat post. There is a problem with your site in web explorer, may check this?K IE still is the marketplace leader and a good section of people will pass over your excellent writing due to this problem.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.