Mon. Jan 24th, 2022

‘हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात आणूया’; राष्ट्रपती कोविंद यांचे रायगडावर उद्गार

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपतींना दांडपट्टा, भवानी तलवार, अज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होणची प्रतीकृती भेट दिली. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रपती महोदयांनी प्रथम होळीच्या माळावारील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर दौऱ्याच्या शेवटी शिव समाधीचे दर्शन घेतले.

तब्बल ३५ वर्षांनंतर रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शिवरायांना मुजरा करण्यात आला. दरम्यान राजसदर येथे छोटेखान कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी शिव छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल कौतुकोद्गार काढले. या मार्गावर चाललो तर आपण एकवीसाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रती कल्पना साकार करू, असा विश्वास राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केला.

खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘रायगड किल्लायेच संवर्धन-जतन केले जात आहे. रायगड किल्ला अनेकांचा आदर्श होऊ शकतो याची माहिती मी राष्ट्रपतींना दिली होती. राष्ट्रपती स्वत: शिवभक्त असल्यामुळे मी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते’, असे ते म्हणाले. तसेच मी स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळे रायगडावर काहीही चुकीचे घडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *