Sat. Sep 21st, 2019

ग्रामीण भागात वाचनाचं महत्त्व वाढवायला ‘त्याने’ सुरू केलं बैलगाडीवर वाचनालय

0Shares

आजच्या आधुनिक आणि प्रगत युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट तात्काळ हवी असते. सोशल मीडियाचं देखील प्रमाण वाढलं आहे. या कारणामुळे ग्रामीण भागातील मुलांना शालेय जीवनातच वाचनाचं महत्व कळावं, म्हणून सोलापूरच्या एका वाचनप्रेमी अवलियाने बैलगाडीच्या साहाय्याने फिरते वाचनालय सुरु केलंय. ग्रामीण भागात या वाचनालयास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्शनहळ्ळी चार हजार लोकवस्तीचं गाव आहे.

गावात जिल्हापरिषदेची एकच मराठी शाळा आहे. ती ही 7 वी पर्यंतच.

याच गावातील उच्च शिक्षण घेणाऱ्या काशिनाथ कोळी यांच्या संकल्पनेतून फिरते बैलगाडी वाचनालय सुरु केलंय .

काशिनाथ कोळी यांचं शिक्षण बी ए ( इंग्लिश ) झालंय.

ते आता सोलापूर शहरातील एका वाचनालयात काम करतात आणि इंग्लिश विषय घेऊन पुढील शिक्षण घेत आहेत.

त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.

ग्रामीण भागातील मुलांना शालेय जीवनापासून वाचनाची गोडी लागावी आणि शिक्षणाचे महत्व कळावे म्हणून त्यांनी फिरते वाचनालय सुरु केले आहे.

ग्रामीण भागात दळण वळणाचे मुख्य साधन आजही बैलगाडी आहे, बैलगाडीला जास्त खर्च येत नाही. कोठेही वाड्या वस्त्यांवर बैलगाडी सहज घेऊन जाता येते.

काशिनाथ कोळी हे दिवसभर काम करून सायंकाळी फिरत्या वाचनालयांची बैलगाडी घेऊन गावभर फिरतात.

गावातील प्रत्येक व्यक्तीने वाचावं हा त्यांचा उद्देश आहे.

मित्र, स्वकीय यांच्या वाढदिवशी त्यांच्याकडून एक पुस्तक मागून घेतात. आज त्यांच्याकडे 200 पुस्तकांचा संग्रह आहे. त्यांच्या ‘माऊली वाचनालया’स चांगला प्रतिसाद देखील मिळत असून ग्रामीण भागातील तरुण त्यांच्या कार्यावर खुश आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *