Tue. May 17th, 2022

गावीत बहिणींना जन्मठेपेची शिक्षा

बालहत्याकांडप्रकरणी गावीत बहिणींना मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बालहत्याकांड प्रकरणी आज निर्णय घेतला आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाल्यामुळे गावीत बहिणींनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

ऑक्टोबर १९९६पासून पोलिसांच्या कोठडीत असलेल्या या दोन महिलांनी २०१४मध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यासाठी दयेची याचिका दाखल केली होती. २०१४मध्ये या गावीत बहिणांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने गावीत बहिणींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

१९९० ते १९९६ दरम्यान गावीत बहिणींनी १३ मुलांचे अपहरण करून ९ मुलांची हत्या केली. याप्रकरणी कोल्हापूर न्यायालयाने या गावीत बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, कोल्हापूरमधील बालहत्याकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, गावीत बहिणींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२० वर्षांपूर्वी या गावीत बहिणींवर फाशीची शिक्षा अद्याप झाली नाही, त्यामुळे जगण्याची अपेक्षा वाढली असल्याचे सांगत या गावीत बहिणींनी फाशीची शिक्षा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

1 thought on “गावीत बहिणींना जन्मठेपेची शिक्षा

  1. Your place is valueble for me. Thanks!?This web page is known as a stroll-by means of for all the information you needed about this and didn’t know who to ask. Glimpse here, and you’ll definitely uncover it.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.