मुंबई: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जवळपास प्रत्येकांनाच केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा किंवा स्कॅल्पला खाज येणे, यांसारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून अनेकजण महागड्या शॅम्पू, तेल किंवा सिरम वापरतात. पण अनेकदा या उत्पादकांचा वापर फारसा उपयोगी होत नाही. अशावेळी, घरच्या घरी मिळणारे नैसर्गिक उपाय वापरणे लाभदायक ठरू शकतो. त्यातही, आवळा आणि अॅलोव्हेरा हे दोन घटक केसांसाठी वरदान मानले जातात.
केसांसाठी आवळा वापरण्याचे 'हे' आहेत फायदे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, लोह आणि इतर पोषणतत्त्वांचा भरपूर समावेश आहे. हे घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केसगळती कमी करतात. आवळ्यामुळे स्कॅल्पमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे, केस अधिक निरोगी आणि घनदाट दिसतात. आवळ्याचे तेल, पावडर किंवा ज्युस अशा कोणत्याही स्वरूपात तो वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारते. सोबतच, नियमित आवळा वापरल्यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. तसेच, केस पांढरे होण्याची समस्या कमी होते.
केसांसाठी अॅलोव्हेरा वापरण्याचे 'हे' आहेत फायदे
अॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई सारख्या अनेक गोष्टी असतात, जे स्कॅल्पला थंडावा देतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. अॅलोव्हेरा वापरल्याने स्कॅल्प स्वच्छ राहण्यास मदत होते आणि कोंडा होण्याची शक्यता कमी होते. तसेच, अॅलोव्हेरा वापरल्यामुळे केसांची वाढ सुधारते, केसगळती कमी करते. सोबतच, अॅलोव्हेरा केसांना डिहायड्रेशन रोखण्यास मदत करते आणि केसांना मऊ व मजबूत बनवते.
हेही वाचा: Hair Tips: केस गळती आणि कोंडा दूर करण्यासाठी 'या' गोष्टी नक्की लावा
आवळा की अॅलोव्हेरा? कोणता उपाय ठरणार लाभदायक?
आवळा आणि अॅलोव्हेरा हे दोन्ही घटक केसांसाठी फायदेशीर आहेत. एकीकडे, आवळा केसांना आतून मजबूत करतो आणि गळती कमी करण्यास मदत करतो. दुसरीकडे, अॅलोव्हेरा केसगळती कमी करते आणि स्कॅल्पला थंडावा देतात. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी दोन्हींचा वापर करणे लाभदायक ठरते.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)