Thursday, May 22, 2025 10:34:41 PM

कुत्र्या-मांजरांनाही होतो उन्हाळ्याचा त्रास; अशी घ्या प्राण्यांची काळजी

मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना माणसापेक्षाही अधिक त्रास होतो. पण ते सांगू शकत नसल्याने आपण त्यांची स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे.

कुत्र्या-मांजरांनाही होतो उन्हाळ्याचा त्रास अशी घ्या प्राण्यांची काळजी

Heat Problem In Pets : बरेच लोक घरी कुत्रा-मांजर पाळतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांच्या घरी असे प्राणी आहेत, तर या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या प्राण्यांची काळजी घेऊ शकता. उन्हाळ्यात प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही सहजपणे उपयोगात आणू शकता.

उन्हाळ्याच्या काळात कुत्र्या-मांजरींना उष्णता आणि हीट स्ट्रोकपासून वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही या उपायांचे मदतीने तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजरीची काळजी सहजपणे घेऊ शकता.

हेही वाचा - डक्ट एअर कूलर एसीपेक्षाही फायदेशीर; फक्त एक खोली नाही तर संपूर्ण घर थंड होईल!

मानवाच्या निसर्गातील प्रमाणाबाहेर वाढलेल्या हस्तक्षेपामुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेच्या झळांमुळे प्राण्यांना माणसापेक्षाही अधिक त्रास होतो. पण ते सांगू शकत नाहीत. यासाठी त्यांची स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात, प्राण्यांना आणि पक्ष्यांना माणसांपेक्षा जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते. उष्णतेपासून वाचण्यासाठी मानव विविध उपायांचा अवलंब करत असतो. परंतु, हा ऋतू प्राणी आणि पक्ष्यांसाठी खूपच त्रासदायक आहे.

थंड जागा निवडा
उन्हाळ्यात तुमच्या कुत्रा किंवा मांजरीला थंडपणा असेल, अशा जागी ठेवा.  तुम्ही या प्राण्यांना हवेशीर खोलीत देखील ठेवू शकता. जागा बदलल्यामुळे प्राण्यांना सुरुवातीला ही बाब लक्षात येणार नाही, पण दोन-तीन दिवसांत त्यांना या बदललेल्या जागेची सवय होईल.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेवर लक्ष ठेवा
उन्हाळ्याच्या काळात तुमच्या घरातील प्राण्यांवर लक्ष ठेवा. जर तुमची मांजर किंवा कुत्रा जोरजोरात श्वास घेत असेल किंवा धाप लागल्यासारखे करत असेल किंवा उलट्या करत असेल तर, ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांना ताबडतोब थंड पाण्याने आंघोळ घाला. सौम्य चव येईल एवढे साखर आणि मीठ पाण्यात घालून ते प्यायला द्यावे.

अन्नाकडे लक्ष द्या
उन्हाळ्यात प्राण्यांचं खाणं कमी होऊ शकतं. अशा परिस्थितीत त्यांना दिवसभरात हलके आणि नाशवंत नसलेले अन्न खाण्यास द्या. शिळे अन्न देण्याचे टाळा.

प्राण्यांना रोज आंघोळ घाला
उन्हाळ्यात प्राण्यांना शक्यतो रोज आंघोळ घालावी. अंघोळीची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ. यावेळी हवामान थंड असते. फार थंड नाही अशा अगदी कोमट पाण्याने अंघोळ घालावी. कुत्र्या-मांजरींसाठी बाजारात एक खास प्रकारचा शाम्पू उपलब्ध आहे, तो वापरावा. माणसांसाठीचा शाम्पू किंवा साबण वापरू नका.

घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत भांड्यात पाणी ठेवा
भटके प्राणी, झाडावर राहणारे पक्षी यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो. उन्हाळ्यात उष्माघाताने प्राणी-पक्ष्यांचेही मृत्यू झाल्याचे ऐकायला मिळते. तर, या प्राणी-पक्ष्यांसाठी घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत भांड्यात पाणी ठेवावे. तसेच, एखादा आजारी प्राणी पक्षी आढळल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे.

मानवाच्या निसर्गातील प्रमाणाबाहेर वाढलेल्या हस्तक्षेपामुळे तापमानवाढ होत आहे. जीवसृष्टी धोक्यात आली आहे. जीवसृष्टी धोक्यात येण्याचा अर्थ नजिकच्या काळात आपण स्वतःही धोक्यात येणे असाच होतो. त्यामुळे यातील घटकांना वाचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे.

हेही वाचा - मुले रात्री लवकर झोपत नाहीत? शांत झोपवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स


सम्बन्धित सामग्री