Bollywood Star Vicky Kaushal : बॉलीवूडमधील स्टार अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. चित्रपटातील त्याची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अनेक वर्षे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत राहील. त्याच्या अभिनयाचे आणि ही भूमिका साकारण्यासाठी त्याने घेतलेल्या कष्टांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण हे फारच कमी लोकांना हे माहिती असेल की, विकी कौशल एका गंभीर आजारातून गेला आहे. या आजारात त्याला हातपाय हलवणेही कठीण झाले होते.
विकी कौशलला कोणता गंभीर आजार झाला होता?
'छावा' चित्रपटानंतर विकी कौशलचा चाहता वर्ग कमालीचा वाढला आहे. मात्र, त्याच्या बऱ्याच चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की त्याला एक गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता. याचं नाव स्लीप पॅरालिसिस असं आहे. या आजारात त्याला हातपाय हलवणेही कठीण झाले होते. विकी कौशलने स्वतः एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली. विकी नेमकं काय झालं होतं? आणि हा आजार किती गंभीर स्वरूपाचा असतो, तसेच त्यावर कोणते उपाय आहेत, याविषयी माहिती घेऊ...
हेही वाचा - ही कोण आहे माहितीये? ऐश्वर्या राय..? मुळीच नाही.. ही तर पाकिस्तानची..
स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?
विकी कौशल स्लीप पॅरालिसिस नावाचा एक गंभीर आजारानं त्रस्त होता. या आजारात व्यक्ती झोपेलेल्या वेळी काहीही हालचाल करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही. विकीने स्वतः या आजाराची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. विकिने सांगितलं की, त्याच्यासाठी हा खूप भयानक अनुभव होता. पण त्यावर मात करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही तो म्हणतो. हा आजार म्हणजे एक 'स्लीपिंग डिसऑर्डर' आहे.
स्लीप पॅरालिसिसची लक्षणे
स्लीप पॅरालिसिसमध्ये, तुम्ही झोपेतून उठल्यावर किंवा झोपायला जाण्याच्या आधी, तुमच्या शरीरास हलवता येत नाही, पण तुमच्या डोक्यात आपण जागे असल्याचा पूर्णपणे अनुभव येतो, जी एक भीतीदायक अनुभव असू शकते, ज्यात बोलू शकत नाही, हालचाल करु शकत नाही, आणि काहीवेळा श्वासाला त्रास होतो.
स्लीप पॅरालिसिसची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
हालचाल करण्यास असमर्थता: तुम्हाला तुमचे शरीर किंवा एखादे विशिष्ट अवयव (हात, पाय) हलवता येत नाही. शरीर जखडल्यासारखे वाटते.
बोलण्यास असमर्थता: बोलता येत नाही.
जागे असल्याची जाणीव; मात्र, हलता येत नाही - व्यक्तीला पूर्णपणे जाणीव असते की, तो झोपेतून जागे झालेले आहे. तरीही, हालचाल करता येत नाही.
भीती आणि चिंता: रुग्णाला भीती वाटू शकते किंवा चिंता होऊ शकते, जसे की तुमच्या वरती काहीतरी आहे आणि ते तुम्हाला हलू देत नाही.
विचित्र दृश्य दिसणे : अनेकवेळा लोक काहीतरी विचित्र दृश्य दिसल्याचा किंवा विचित्र आवाज ऐकल्याचा अनुभव सांगतात. ही स्थिती जास्त भीतीदायक वाटू शकते.
श्वास घेण्यास त्रास: काहीवेळा लोकांना छातीत दाब जाणवल्याचा किंवा गुदमरल्यासारखे वाटू शकते.
विचित्र कल्पना किंवा हॅल्यूसिनेशन: रुग्णाला विचित्र स्वप्ने किंवा भावना वाटू शकतात.
डोळे मिटून राहणे: काही लोकांना डोळे उघडण्यात देखील अडचण आल्याचा अनुभव येतो.
हा एक झोपेचा आजार आहे. हे झोपेच्या पद्धती बदलल्यामुळे होऊ शकतो. यामध्ये, असे वाटते की, ती व्यक्ती झोपेतून जागी तर झाली आहे, पण अंथरूणावर उठू शकत नाही, अगदी कोणतेही काम करू शकत नाही. ही अशी स्थिती असते, ज्यात खूप प्रयत्न करूनही व्यक्तीला हात-पाय हलवता येत नाहीत. यासोबतच, या आजारादरम्यान, व्यक्तीला झोपेत उंच ठिकाणाहून पडणे, पाण्यात बुडणे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा भयानक गोष्टी दिसतात.
हेही वाचा - 'औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा, ती हटवण्याची काहीच गरज नाही; भारत आमच्या बापाचा आहे!'
स्लीप पॅरालिसिस कशामुळे होतो?
स्लीप पॅरालिसिस झोपेच्या विकारांपैकी एक आजार असल्यामुळे यात मोठे कारण म्हणजे झोपेचा अभाव. तसेच झोपण्याच्या पद्धतीत बदल, मादक पदार्थांचे सेवन जास्त केल्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त ताण घेणे, पॅनिक डिसऑर्डर आणि मेंदूवर जास्त दबाव आल्याने देखील हा आजार उद्भवू शकतो.
स्लीप पॅरालिसिसवर उपाय काय?
स्लीप पॅरालिसिसच्या बाबतीत बिघडलेली जीवनशैली सुरळीत करणे आणि चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात निरोगी दिनचर्यांचा समावेश करून जास्तीतजास्त विश्रांती घेणे महत्त्वाचे. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे, आनंद वाटेल अशा गोष्टीमध्ये मन रमवणे, पोषक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वा गोष्टींवर जोर देणे गरजेचे आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)