मुंबई : ड्रॅगन फळ नावाप्रमाणे ड्रॅगनसारखेच असते. ते उष्णकटिबंधीय प्रदेशात पाहायला मिळते. ड्रॅगन फळाचे आवरण लाल, गुलाबी पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाचा असते. ड्रॅगन या फळाचे असंख्य फायदे आहेत. परंतु त्याचे तोटे जाणून घ्या.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ड्रॅगन फळ खाण्याचे दुष्परिणाम
ऍलर्जीक समस्या: काहींसाठी ड्रॅगन फ्रूट ऍलर्जीक समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते.काही लोकांना ड्रॅगन खाण्यामुळे खाज सुटणे, सूज, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी किंवा आणखी गंभीर लक्षणे जाणवू शकतात. ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे. त्यांनी ड्रॅगन फळ खाताना काळजी घ्यावी.
पाचक अस्वस्थता: ड्रॅगन फ्रूटचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. अतिसार, पोटदुखी, किंवा संवेदनाक्षम व्यक्तींमध्ये सूज येणे असे प्रकार होऊ शकतात.
हेही वाचा : पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तृतीपंथीयाने केले असे कृत्य, पाहून बसेल धक्का
रक्तातील साखरेची पातळी : उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या आजारांवर औषधोपचार करणाऱ्यांनी ड्रॅगन फळाचा समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ड्रॅगन फळाचे सेवन त्यांच्यासाठी हानी पोहोचवणारे असू शकते. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक साखर असली तरी, ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी याचे सेवन प्रमाणात करावे.
मुतखडा जोखीम: किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी ड्रॅगन फ्रूट माफक प्रमाणात सेवन करावे. त्यात ऑक्सॅलेट्स असतात. जे किडनी स्टोन तयार होण्यास हातभार लावू शकतात. त्यामुळे किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी ड्रॅगन फळाचे सेवन करणे टाळावे.
हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?
कमी पोषणतत्त्वांचे स्रोत: ड्रॅगन फ्रूट पोषणतत्त्वांनी समृद्ध असले तरी, ते फळ इतर फळांच्या तुलनेत कमी प्रमाणात पोषणतत्त्व प्रदान करते.