Wednesday, April 22, 2026 10:51:51 PM

Free Devdarshan : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण होणार; 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'त सरकार उचलणार इतका खर्च

आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना इच्छा असूनही देवदर्शन करणे शक्य नाही, अशा ज्येष्ठांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य आणि देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश केला आहे.

free devdarshan  ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण होणार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत सरकार उचलणार इतका खर्च

Mukhymantri Tirth Darshan Yojana : महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' नव्या आणि अधिक सक्षम स्वरूपात समोर आणली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना इच्छा असूनही देवदर्शन करणे शक्य नाही, अशा ज्येष्ठांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत देशातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 अशा एकूण महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका प्रवासासाठी शासन प्रति व्यक्ती कमाल 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार असून, यात निवास, भोजन आणि प्रवासाच्या सर्व खर्चाचा समावेश असेल. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही योजना आता अधिक पारदर्शक करण्यात आली आहे.

पात्रता आणि महत्त्वाचे निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निश्चित अटी घातल्या आहेत, ज्या पूर्ण करणे आवश्यक आहे:

- अर्जदाराचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रहिवासी असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- प्रवासासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र (Medical Certificate) सादर करणे बंधनकारक आहे.
- ज्यांची पूर्वी लॉटरीत निवड झाली होती पण त्यांनी प्रवास केला नाही, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही.

हेही वाचा - Painkuni Arattu Shobhayatra: देवाच्या सोहळ्यासाठी विमानेही थांबली! तिरुवनंतपुरम विमानतळाचा रनवे पाच तास बंद, पद्मनाभस्वामींच्या 'अरट्टू' सोहळ्याची अद्भूत परंपरा

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती ऑनलाइन पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू केंद्रांमार्फत पूर्ण करता येईल. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:

- आधारकार्ड आणि रेशनकार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile) किंवा जन्म दाखला.
- सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला.
- अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र.
- जे नागरिक स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सेतू केंद्रांवर मोफत अर्ज भरून देण्याची सोय करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया आणि प्रवासाचे नियम
जिल्हास्तरीय समितीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येनुसार कोटा निश्चित केला जातो. जर अर्जांची संख्या उपलब्ध कोट्यापेक्षा जास्त असेल, तर संगणकीकृत 'लॉटरी' पद्धतीने नावे निश्चित केली जातात. प्रवासाचे नियोजन IRCTC सारख्या अधिकृत संस्थांमार्फत केले जाते. निवडलेल्या प्रवाशांनी नियोजित रेल्वे स्थानकापर्यंत स्वखर्चाने पोहोचणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान शिस्तीचे पालन करणे आवश्यक असून, खोट्या माहितीच्या आधारे लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताला कायमस्वरूपी अपात्र ठरवले जाईल.

हेही वाचा - Hanuman Jayanti 2026 : संकटमोचकाची अद्भूत रूपे; जाणून घ्या भारतातील अद्भूत आणि जागृत हनुमान मंदिरांचे रहस्य


सम्बन्धित सामग्री