मुंबई : भेंडी ही केवळ चविष्ट भाजी नसून, केसांच्या आरोग्यासाठीसुद्धा एक वरदान आहे. भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी, के, आणि झिंक, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. जे केसांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
भेंडीचे पाणी केसांना लावल्याने केस गुळगुळीत होतात, त्यातील चिकटपणा नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतो. यामुळे केसांच्या कोंड्याची समस्या कमी होते, केस गळतीही आटोक्यात येते. तसेच कोरडेपणा दूर होतो. भेंडीमध्ये असलेले म्युसिलेज केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवते. ज्यामुळे केस अधिक चमकदार आणि मजबूत होतात.
हेही वाचा : अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान; सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा
भेंडी केसांना कशी लावावी?
भेंडीचे पाणी तयार करण्यासाठी काही भेंडीच्या शेंगा छोटे तुकडे करून रात्रीभर पाण्यात भिजवाव्यात. सकाळी हे पाणी गाळून केसांना लावा. त्यानंतर 30 ते 45 मिनिटांनी धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास उत्तम परिणाम दिसून होईल.
भेंडीचे पाणी केवळ नैसर्गिक उपाय म्हणूनच नाही, तर खर्चिक केमिकल उत्पादनांपासून दूर राहण्यासाठीसुद्धा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे केस गळणे, कोरडेपणा, कोंडा यांसारख्या समस्यांसाठी भेंडीचा वापर नक्की करावा.