Friday, December 05, 2025 02:21:12 AM

Secret Tea Recipe: जगातील सर्वोत्तम चहा कसा तयार होतो? जाणून घ्या खास रेसिपी

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांनी जगातील सर्वोत्तम चहाचे रहस्य सांगितले.

secret tea recipe जगातील सर्वोत्तम चहा कसा तयार होतो जाणून घ्या खास रेसिपी

Ranveer Brar Secret Tea Recipe: भारतासह जगभरात चहा हा फक्त पेय नसून भावनेशी जोडलेला अनुभव आहे. प्रत्येक घराचा चहा बनवण्याचा एक वेगळा अंदाज असतो. परंतु अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांनी जगातील सर्वोत्तम चहाचे रहस्य सांगितले. यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया यांनी त्यांना विचारले की, “जगातील सर्वोत्तम चहा तुम्ही कसा बनवता?” त्यावर ब्रार हसत उत्तर देतात “मी नाही… माझे बाबा जगातील सर्वोत्तम चहा बनवतात. त्यांची रेसिपी यूट्यूबवरही आहे!” त्यांच्या या खुलाशानंतर लोकांमध्ये जगातील सर्वोत्तम चहा विषयी उत्सुकता वाढली आहे. या मुलाखतीत ब्रार यांनी सांगितलेली चहा बनवण्याची खास पद्धत चर्चेचा विषय बनली आहे.

योग्य प्रमाणात पाणी

ब्रार सांगतात की परिपूर्ण चहाची पहिली गुरुकिल्ली म्हणजे योग्य प्रमाण. 4 कप चहा बनवायचा असल्यास 2 ते 2.5 कप पाणी वापरणे उत्तम ठरते. यामुळे दूध-पाण्याचे संतुलन उत्तम राखले जाते आणि चहाचा अस्सल स्वादही टिकून राहतो. पाणी जर व्यवस्थित उकळले नाही तर चवीवर परिणाम होतो, म्हणून सर्वप्रथम पाणी उकळीला आणणे महत्त्वाचे आहे.

आले आणि चहा पानांचा सुवास

पाणी उकळू लागताच सर्वात आधी कुस्करलेले आले घालावे. आले नीट शिजून त्याचा रस पाण्यात मिसळेपर्यंत थोडा वेळ थांबावे. यानंतर चहाची पाने घालण्याची वेळ येते. ब्रार सांगतात की, पाने टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटे उकळू द्यावे, जेणेकरून संपूर्ण चव पाण्यात उतरते.

हेही वाचा - Anti-Aging Medicine : माणूस आता 150 वर्ष जगणार? चीनच्या संशोधकांचे वार्धक्य रोखणारे मोठे संशोधन

चहात दूध कधी घालावे?

बहुतेक लोक चहाची पाने घातल्यानंतर लगेच दूध ओततात, पण ब्रार याचा विरोध करतात. ते सांगतात की दूध शेवटी आणि हळू हळू घालावे. थेट थंड दूध टाकल्याने चहा चविष्ट होत नाही. शेवटी गरम दूध घातल्याने मसाला, चहाची पाने आणि आले यांचा मिश्र सुगंध दुधात एकत्रित होऊन चहा अधिक सुगंधी आणि दाटसर बनतो.

चहामध्ये साखर कधी घालावी?

चहा बनवताना साखर घालण्याची वेळही अत्यंत महत्त्वाची आहे. ब्रारच्या मते, दूध घातल्यावरच किंवा लगेचच साखर टाकावी. उष्णतेमुळे साखर सहजपणे विरघळते आणि चहाची चव अधिक संतुलित होते.

हेही वाचा -  Sleep Schedule : 24 तासांपेक्षा जास्त वेळ जागे राहिल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतात?

ऋतूनुसार चहातील बदल

रणवीर ब्रार यांच्या चहा बनवण्याच्या शैलीतला हा सर्वात खास भाग आहे. त्याने ऋतूनुसार चहामध्ये कोणत्या वस्तू घालाव्यात ते सांगितलं आहे. 

उन्हाळ्यात – चहात बडीशेप घालावी. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
हिवाळ्यात – चहामध्ये मुळेठी पावडर घालावी. ती खोकला-सर्दीपासून आराम देते आणि चहाला सौम्य गोडवा व उबदारपणा देते. हे लहानसे बदल चहाची चव आणि परिणामकारकता दोन्ही अनेक पटीने वाढवतात. रणवीर ब्रार म्हणतात, “चहा ही कला आहे. त्यातील प्रत्येक घटकाची वेळ, प्रमाण आणि संयम जपला तरच तो परिपूर्ण होतो.” त्यांच्या वडिलांची ही खास रेसिपी आज लाखो लोक फॉलो करत आहेत आणि ‘जगातील सर्वोत्तम चहा’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.


सम्बन्धित सामग्री