Saturday, January 25, 2025 07:17:19 AM

If you apply lipstick every day then be careful...
दररोज लिपस्टिक लावताय, मग सावधान....

महिलांमध्ये लिपस्टिक लावण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

दररोज लिपस्टिक लावताय मग सावधान

मुंबई : महिलांमध्ये लिपस्टिक लावण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये लिपस्टिक असतेच. कुठे जायचे फिरायला जायचे असेल, पार्टीमध्ये जायचे असेल तर किंवा एखाद्या सण समारंभावेळी तयार होताना महिलांना लिपस्टिक हवीच असते. मेकअपमध्ये लिपस्टिक सगळ्यात महत्त्वाची आणि त्याशिवाय महिलांचा मेकअप पूर्णच होऊ शकत नाही. महिलांमध्ये दररोज लिपस्टिक लावण्याचे प्रमाण दिसून येतो. लिपस्टिकमुळे लूक बदलून जातो. त्यामुळे महिलांना लिपस्टिकचे आकर्षण असते. मात्र या लिपस्टिकचे साइड इफेक्टही पाहायला मिळतात.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

लिपस्टिक बनवताना केमिकल्सचा वापर केला जातो. त्यात लिपस्टिक ही थेट ओठांवर लागत असल्यामुळे पोटातही जाऊ शकते. त्यामुळे त्यातल्या केमिकल्सचा आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊन शकतो. लिपस्टिक तयार करताना मॅग्नीज, कॅडमियम, क्रोमियम आणि अॅल्युमिनियम यासारख्या घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. लिपस्टिकमधील घटक आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. लिपस्टिक ओठांना असताना आपण जेवतो. त्यामुळे लिपस्टिक अन्नपदार्थासोबत पोटात जाण्याची शक्यता असते.  त्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

हेही वाचा : काजू खा आणि डोळे निरोगी ठेवा
 

लिपस्टिकमुळे कॅन्सरचा धोका 


लिपस्टिकमध्ये बऱ्याच प्रमाणात लिड म्हणजेच  शिसे वापरले जाते. लिड शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. बऱ्याच लिपस्टिकमध्ये शरीराला नुकसान करणारे केमिकल वापरले जातात. यामुळे हायपर टेन्शन किंवा हृदयाशी संबंधित त्रास होऊ शकतात. लिपस्टिक बनवताना विविध प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. या प्रिझर्वेटिव्हमुळे कॅन्सरचा धोकादेखील वाढू शकतो. दररोज लिपस्टिक लावणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. लिपस्टिकमध्ये बिस्मत ऑक्सीक्लोराईड नावाचा प्रिझर्वेटिव्ह वापरला जातो. यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. शिवाय या केमिकलमुळे अॅलर्जी होऊ शकते. प्रेग्नन्सीच्या काळात लिपस्टिक मुळीच वापरू नका. गर्भवती महिलांनी लिपस्टिक लावूच नये. काही कारणास्तव लावायची असेल तर  चांगली ब्रँडेड लिपस्टिक वापरावी. शक्यतो हर्बल लिपस्टिकचा वापर करावा. लिपस्टिक खरेदी करताना त्यात कोणती केमिकल्स वापरली आहेत. याची माहिती घ्या. गडद रंगाच्या  म्हणजेच डार्क शेडच्या लिपस्टिकमध्ये हेवी मेटल्स वापलेले असतात. त्यामुळे लिपस्टिक खरेदी करताना शक्यतो न्यूड शेडच्या म्हणजेच लाईट कलरच्या लिपस्टिक कराव्यात. लिपस्टिक ओठांवर लावण्याआधी तूप किंवा लिपबाम लावा. यामुळे साईड इफेक्टचा धोका कमी असतो. स्वस्तातली लिपस्टिक खरेदी करणे टाळा कारण त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या केमिकल्सचा वापर केला असेलच असे नाही लिपस्टिक खरेदी करताना त्यातल्या केमिकल्सची माहिती जरूर घ्या. 


सम्बन्धित सामग्री