आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' टिप्स
Edited Image
Smart Tips For Health Insurance: आरोग्य विमा ही सध्या काळाची गरज बनत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तथापि, यापैकी बरेच लोक आरोग्य विम्याच्या वाढत्या प्रीमियममुळे त्रस्त आहेत. जवळजवळ सर्व आरोग्य विमा कंपन्या जास्त प्रीमियम आकारत आहेत. आरोग्य विमा पोर्ट म्हणजेच कंपनी बदलूनही लोकांना फारसा फायदा मिळत नाही. जर तुम्हीही वाढलेल्या प्रीमियममुळे त्रस्त असाल आणि त्यावर उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला त्यासाठीची नेमकी पद्धत सांगत आहोत. तुम्ही या टिप्स फॉलो करून तुमचा प्रीमियम सहजपणे कमी करू शकता.
लवकर खरेदी करा आरोग्य विमा -
आरोग्य विम्याचा प्रीमियम कमी करण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे तरुण वयात पॉलिसी खरेदी करणे. आरोग्य विम्याचा प्रीमियम तुमच्या वयावर आणि आरोग्याच्या स्थितीवर आधारित असतो. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही निरोगी असता. म्हणजेच, तुम्ही आजारांनी वेढलेले नाहीत. जर 25 वर्षांच्या व्यक्तीने आरोग्य विमा खरेदी केला तर त्याला 40 वर्षांच्या व्यक्तीपेक्षा खूपच कमी प्रीमियम भरावा लागतो.
नेटवर्क रुग्णालये आणि बेड-शेअरिंग -
तुमच्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुविधा देणाऱ्या कंपनीकडून प्रीमियम घ्या. यासह, जर तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर तुम्हाला कमी कव्हरमध्ये उपचार मिळू शकतील. यामुळे आरोग्य विम्याचे प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे तुमचा खिशाबाहेरचा खर्च देखील कमी होतो. याशिवाय, तुम्ही मल्टी-बेड शेअरिंग निवडून प्रीमियम आणखी कमी करू शकता.
हेही वाचा - पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल, तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी! अन्यथा नंतर होईल पश्चात्ताप
वजावट आणि सह-पेमेंट पर्याय निवडा -
वजावट आणि सह-पेमेंट पर्याय निवडून तुम्ही जास्त प्रीमियम वाचवू शकता. वजावट आणि सह-पेमेंट कलमांचा पर्याय निवडल्याने तुमचा आरोग्य विमा प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
हेही वाचा - फॅक्ट चेक: मसालेदार चिकन-मटण खाल्ल्यावर हृदयविकाराचा झटका? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण!
सुपर टॉप-अप प्लॅन -
तुमचा आरोग्य विमा अधिक परवडणारा बनवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप प्लॅन खरेदी करणे. यामुळे तुमचे कव्हर वाढते आणि प्रीमियमचा भार कमी होतो.
हेही वाचा - हिवाळ्यात कोणते ज्यूस पिणे शरीरासाठी ठरते फायदेशीर ?
डिजिटलचा फायदा घ्या -
ऑनलाइन आरोग्य विमा खरेदी करणे हा पैसे वाचवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण त्यामुळे मध्यस्थांची गरज आणि अतिरिक्त शुल्क कमी होते. याचा अर्थ असा की प्रीमियम कमी होतो. शिवाय, तुम्ही पॉलिसींची ऑनलाइन सहजपणे तुलना करू शकता, ज्यामुळे तुम्हाला सर्वात स्पर्धात्मक दरात सर्वात योग्य योजना मिळेल.